
२१ जानेवारीलाच (श् श् २९ वर्षे उलटली त्या गोष्टीला बरं का..), आयुष्याला नवीन वळण लावणार्या ह्याच दिवशी हे माझे मनःपटलावरील शब्दरूप इथे साकारायचा प्रयत्न होता पण राहिलेच…आताच सही…माझ्या मनीचा हा आनंद …..
गुलाबापरी हा दिवस असा सततच हसावा
हाच हात हाती ध्यानी मनी तूच तू वसावा
बरीच पाने जीवनांतली उलटली आहेत परि
भासतो नवाच आज तू मनें आपुली जवळ खरी
वर्षांपुर्वी जो आपण होता डाव एक मांडला
वाटतो ना दोघांनाही खराखुरा आज रंगला
संसाराचा ताटवा भरघोस बघ हा बहरला
सुगंध प्रेमाचा दूरवरी त्यातून हा पसरला
आजवरी जी स्वप्ने संग-संगतीने रंगविली
प्रीत भर्या साथीने आपण ती साकारिली
तुझ्या ओठावरी असेच हास्य सदा खुलावे
साथ तुझीच सदा, निर्मळ प्रेम मज मिळावे
दीपिका ‘संध्या’
१८ फेब्रुवारी २००८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा