रविवार, २७ जून, २०१०

ह्या नदीकिनारी...


धुंद हास्य त्या क्षणी
सांज होती रंगलेली
मोगरा गंधित आठवांचा
फुलवु आज ह्या नदीकिनारी

एकांताच्या त्या क्षणी
नजर काही बोललेली
होते काय ते शब्द मुके
अठवु आज ह्या नदीकिनारी

अबोल तु मी, त्या क्षणी
स्पर्शात गोडी भासलेली
अंतरीच्या त्या सुखाला
भिजवु आज ह्या नदीकिनारी

ओल्या चिंब त्या क्षणी
गर्दी मेघांनी केलेली
श्रावणाच्या त्या सरींना
खुणवु आज ह्या नदीकिनारी

दीपिका 'संध्या'

२ टिप्पण्या:

Yogesh म्हणाले...

"एकांताच्या त्या क्षणी
नजर काही बोललेली
होते काय ते शब्द मुके
अठवु आज ह्या नदीकिनारी".....

जबर्‍या...लय भारी...

मस्त जमली आहे कविता!!!

दीपिका जोशी 'संध्या' म्हणाले...

धन्यवाद मनमौजी...