मंगळवार, २२ जून, २०१०

मध्यंतरी खुप रिकामपण आलंय असं वाटत होतं. कंप्युटर वर वेगवेगळे प्रयोग करून बघणे चालुच असते. नेट वर मैत्रिणी मस्तं मस्तं पेंटिंग्ज करतांना मी बघत होते. बस आता आपण पण सुरू करायचेच असं ठरवलं. क्लासची शोधाशोध सुरू करून अखेर माझ्या कलाकृति तयार व्हायला सुरूवात झाली. खिळे आणि मजबुत चकाकणार्‍या दोर्‍यांच्या सहाय्याने मोर व फुलपाखरू तयार झाले. फोटो काढुन मुलांना-मुलींना दाखवले तर आईची करामत इतकी पसंतीस उतरली की अमेरिकेहुन मागण्या आल्या आहेत त्याच्या. बघु या मी किती पुर्ण करू शकते ते....




नंतर पेन्सिल ने कृष्णधवल चित्र काढायला सुरूवात केलीय. आधीपासुनच मला रंगीत चित्रांपेक्षा फक्त पेंसिलीने काढलेले चित्रत भावते. त्यात ज्यास्तं कलाकारी दिसते असं वाटतं. असाच आता थोडा वेळ आपल्यातील कलाकाराला जिवंत ठेवण्यासाठी द्यायचा असे ठरवले आहे.






४ टिप्पण्या:

प्रमोद देव म्हणाले...

फारच सुंदर. दिपुताई,तुमचे हे रुप आम्हाला आजपर्यंत माहीत नव्हतं हो.
आता येऊ द्या असेच काहीतरी नियमितपणे.

दीपिका जोशी 'संध्या' म्हणाले...

धन्यवाद देव काका.. होय नक्कीच प्रयत्न करत राहीन...

shinu म्हणाले...

hey, mau chya scrapbookmadhun ikde bhet dili, blog khupach refreshing look cha aahe. fulpakharu aani mor sundar jamale aahet. cute :)

दीपिका जोशी 'संध्या' म्हणाले...

ओय.. धन्यवाद.. खुप छान वाटलं माझा ब्लॉग तुला आवडला तर.. दिसायला सुंदरच आहे..हेहे...
होय थोडे थोडे असे काही तरी करत राहते... माऊचे च बघुन उत्साह आला मला..