बुधवार, ९ फेब्रुवारी, २०११

कविता माझी फक्त तुझ्याचसाठी

करतात स्वप्ने लोचनात दाटी 
कविता माझी फक्त तुझ्याचसाठी

कलली सांज,वाट तशी अनोळखी

ओढीने तुझ्या ती खुणवी सारखी

स्मरते भेट अपुली ती पहिली 

स्पर्शाने तव मोहीनीच हसली

आठवांचा बांध भलताच आगळा 

वाटले शब्दामधे व्हावा मोकळा 

पुनवेस रात्र कशी ही बावरी 

गंधीत सायली फुलली अंतरी

हात गुंफता रुजल्या प्रेमगाठी 

कविता माझी फक्त तुझ्याचसाठी 

दीपिका जोशी 


२ टिप्पण्या:

स्मिता काळे म्हणाले...

वा क्या बातहै.....प्रेमदिवसाची कविता अप्रतीम...

आशा जोगळेकर म्हणाले...

मनातले भाव शब्दांत सुरेख उतरलेत.