मौनाचा कोलाहल आता सोसवेना
एकांताचा आकांत आता सोसवेना
व्यर्थता आहे आज जागण्यात ही
स्वगत माझे मलाच आता ऐकवेना
नाही धरबंध ह्या बोलण्या हसण्याला
स्वप्नांचा पसारा पण आता आवरेना
बेधुंद रोज रात्री आठवांत तुझिया
नयनी अश्रुंना शांत आता बसवेना
धरी हात घट्ट हातात सोडू नको
विरह अन हुरहुर आता पेलवेना
बकुळीच्या फुलांनी सजव रानवाटा
ठेचाळत काट्यांवरी आता चालवेना
दीपिका 'संध्या'
४ टिप्पण्या:
मौनाचा कोलाहल आता सोसवेना
एकांताचा आकांत आता सोसवेना.... अप्रतिम.
सूंदर कविता लिहिली आहे.वाचून बरं वाटलं.
धन्यवाद....
छान कविता. तुमचा हा पैलू मला माहितच नव्हता. अजून येऊद्यात
टिप्पणी पोस्ट करा